रव्याचं झटपट घावन

८ ते १० लहान घावन
वेळ: २० मिनीटे (पिठ भिजवून तयार झाल्यावर)

साहित्य

१ वाटी रवा

१/२ कप दही

१ चमचा बेसन

१/४ कप तेल

लसणाच्या ३-४ पाकळ्या

१/२ टिस्पून आलेपेस्ट

२ हिरव्या मिरच्या

मीठ चवीनुसार

कृती

दह्यात थोडे पाणी घालुन एकत्र करून घट्ट ताक बनवून घ्यावे.

त्यात रवा घालून अर्धा तास भिजत ठेवा. लागल्यास अजून थोडे ताक/ पाणी घालावे. मिश्रण पातळ नको आणि खुप घट्टही नको.

मिश्रण एक दिड तास झाकून ठेवून दयावे.

त्यानंतर त्यात चण्याचं पीठ घालावं. व व्यवस्थित मिक्स करावे , गुठळ्या रहाता कामा नये .

हे पीठ सैलसर असावं. याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानुसार पाणी कमी जास्त टाकून व्यवस्थित मिक्स करावे .

नंतर लसणाचे आणि मिरचीचे बारीक तुकडे करून किंवा जाडसर वाटून त्यात घाला.

नॉनस्टिक/ लोखंडी तव्यावर तेल सोडून गरम करावा. तवा गरम झाला कि १ डाव मिश्रण घालावे, फक्त पळीने पसरू नये, तवाच फिरवावा .घावन जाडसरच ठेवावे. मिडीयम हाय फ्लेमवर तव्यावर झाकण ठेवून शिजू द्यावा. एक बाजू शिजली कि थोडे तेल घालून दुसरी बाजू भाजून घ्यावी.

गरमागरम घावन, खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खायला द्यावं.

पनीर पराठा

पनीर पराठा

साहित्य

१/२ वाटी किसलेलं पनीर
१ चमचा लोणच्याचा मसाला
१/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
मुठभर कोथिंबीर चिरून
मीठ-साखर चवीप्रमाणे
२ वाट्या कणीक
तेल किंवा तूप किंवा बटर

कृती

प्रथम कणकेत १/४ टिस्पून मीठ व १ टे.स्पून तेल घालून मऊसर कणीक भिजवून झाकून ठेवावी .

व सारणाचे जिन्नस तयार करावे ,कांदा बारीक चिरावा .कोथिंबीर चिरून घ्यावी .

एका वाडग्यात कीसलेले पनीर , बारीक कापलेला कांदा , कोथिंबीर , लोणच्याचा तयार मसाला , चवीनुसार मीठ व चिमूट साखर घालून हलक्या हातानं मिसळावं .

आता कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करावे . व फुलके लाटून घ्यावे .
आता एका फुलक्यावर पनीरचे मिश्रण पसरावं . त्यावर दुसरं फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातांनी जरासा लाटावा व तव्यावर शेकावा .

शेकतांना तेल, तुप किंवा बटर लावावे .

गरमागरम पराठा सर्व्ह करावा .