मटार कचोरी

न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाता येईल अशी चटपटीत मटार कचोरी….
जिन्नस

२ वाट्या मैदा
१ वाटी बारीक रवा
१ किलो मटार

मूठभर

कोथिंबीर

३ – ४ चमचे काजू अणि किसमीस

१०० ग्रॅम ओलं खोबरं

२५ ग्रॅम खसखस

१/२ चमचा लाल तिखट

४ – ५ हिरव्या मिरच्या

१/२ चमचा हळद

१ चमचा गोडा मसाला

मीठ चवीनुसार

२ चमचे लिंबाचा रस

१/२ चमचा साखर

१ चमचा जीरे पावडर

१ चमचा धणे पावडर

पाककृती

प्रथम परातीत मैदा घेवून त्यात बारीक रवा व ५ – ६ चमचे तेल व चवीपूरत मीठ घालून घट्ट भिजवून २ – ३ तास बाजूला ठेवा.
नंतर मटार सोलून मिक्सर मधून भरडसर वाटून घ्या. त्यात ४ – ५ हिरव्या मिरच्या बारीक क

रुन घाला .

नंतर एका कढईत ४ – ५ चमचे तेल गरम करुन मोहरी, जीरे घाला नंतर त्यात खोबरे(किस) घालून थोडं परतून घ्या.
त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व हळद, तिखट, काळा मसाला/गोडा मसाला, धणे पावडर व जीरे पावडर घालून परता. परतल्यावर त्यात मटारची भरड घाला व चांगले मिसळून घ्या. नंतर त्यात काजू, किसमीस घालून व आवडीनुसार साखर व चवीपूरते मीठ घाला. सारण तयार

…..

आता पिठाच्या गोल पुर्‍या लाटून त्यात मटार सारण घालून त्या बंद करून चपटे वडयासारखे करा.
कढईत तेल गरम करुन तयार कचोरी गुलाबी होईपर्यंत तळून घ्या.
स्वादिष्ट मटार कचोरी तयार. गरम गरम मटार कचोरी चिंचेच्या किंवा पुदीनाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.