sukat

सुकट जवळा नुसतीच किंवा विविध भाज्यांसह व विविध प्रकारे बनवता येते. एक प्रकार आज पाहू या.

साहित्य
२ कांदे चिरून
२ ते ३ छोट्या पळ्या तेल
१/४ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला/ तिखट
चवीपुरते मीठ (कमीच घालावे कारण सुका जवळा खारट असतो)
१ मिरची
थोडी कोथिंबीर चिरून

सुकट / सुका जवळा १ कप

कृती

प्रथम जवळा चांगला २ ते ३ पाण्यांतून धुऊन घ्यावा.

भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत तळावा. मग त्यात हिंग, हळद, मसाला घालून जवळा घालावा.

थोडे पाणी घालावे किंवा वाफेवर शिजवला तरी चालतो मध्ये मध्ये ढवळावे.

१० मिनिटांनी ढवळून त्यात मीठ, मिरची घालावे. परत थोडावेळ वाफ आणावी.

आता त्यात कोथिंबीर घालावी व २ मिनिटे वाफ आणून गॅस बंद करावा.

ह्या प्रकारातही वांगे खास करून जवळा वांगे, बटाटा असे कॉम्बिनेशन चांगले लागते. तसेच शेवग्याच्या शेंगाही चविष्ट लागतात.