आमलेट पोहे (OMELET POHA)

20150311_093627

आमलेट पोहे 

साहित्य
कांदा . . . . . . . . . १ मध्यम
पोहे . . . .  . . . . . .१.५ वाटी
हिरवी मिरची . . . . २
हळद . . . . . . . .    १ चमचा
काजू . . . . . . . . . . ५_६
कृती
पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवा .

निथळले कि मीठ  व हळद  लावून हलकेच मिक्स करुन ठेवा .

omlet poha
एका कठईत तेल तापवून मोहरीची फोडणी द्या .

मोहरी तडतडली की हिरवी मिरची परतून काजू टाकावे .

काजू लालसर झाल्यावर कांदा  टाकून परतावे .

20150311_092257

कांद्याचा रंग बदलला कि लगेच पोहे टाकून मिक्स करावे .

मंद आचेवर झाकून  वाफ  आल्यावर परत एकदा हलकेच परता  व झाकून ठेवा .

आपले पोहे तयार आहेत .

20150311_093155-1

आमलेट

साहित्य
अंडी . . . .  . . . .     २
मीठ . . . . . . . .      आवश्यकतेनुसार
तेल . . . . . . . . .    .आवश्यकतेनुसार
मिरी पावडर . . . .    चिमूटभर
लाल तिखट . . . .  . १ चमचा
दूध . . . . . . . . . .  . २-३ चमचे
कृती
एका बाऊल मधे अंडी फोडून घ्या .

त्यात मीठ , मिरी पावडर व लाल तिखट टाकून फेटा.

आता दूध टाकून चांगले फेटा .

20150311_092914

नॉनस्टिक पॅन तापवून त्यात २-३ ड्रॉप्स तेल टाकून अंड्याचे मिश्रण पसरवा, २ मिनीटे झाका .

२ मिनीटांनी उलटून न झाकता एखाद मिनिट ठेवा .

20150312_184301

तोपर्यंत एका प्लेटमधे गरमागरम पोहे वाढा व त्यावर गरमागरम आमलेटनी झाका.

20150311_093627

वरतून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

सोबत लोणचं लावल्यास लज्जत अजूनच  वाढेल .

Advertisements

3 thoughts on “आमलेट पोहे (OMELET POHA)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s